10 Rare Insurance Types 2026: Insurance म्हणजे फक्त मृत्यू किंवा आजारपणाचे संरक्षणच नव्हे; तर ते एक असे सुरक्षा कवच आहे जे तुमच्या अपेक्षित नसणाऱ्या संकटांना आर्थिक पाठबळ देते. भारतात बहुसंख्य लोक फक्त आणि फक्त आयुर्विमा आणि आरोग्य विम्यालाच जास्त प्राधान्य देतात. परंतु, बदलत्या जगासोबत विम्याचे स्वरूपही बदलत चालले आहे.
या लेखात आपण अशा १० विम्यांचा सविस्तर माहिती घेऊ, ज्यांच्याबद्दल 99% लोकांना कमी माहिती आहे, पण जे आजच्या काळात खूप जास्त आवश्यक आहेत.
10 Rare Insurance Types
१. वैयक्तिक सायबर विमा / Personal Cyber Insurance
२०२६ मध्ये आपण डिजिटल क्रांतीच्या टोकावर आहोत. जितके जास्त व्यवहार हे ऑनलाइन होता आणि तितकीच मोठी जोखीम ‘सायबर फ्रॉड’चीही असते आणि आप रोज याच्याबद्दल ऐकत असतो परंतु ह्या इन्शुरेंस बद्दल ऐकल नसणार आहे, चला बघूया
Use Cases:
Case 1 : पुण्या मध्ये एका निवृत्त शिक्षकाने चुकून एका अनोळखी लिंकवर क्लिक केल्यामुळे खात्यातून ₹५ लाख गायब झाले. परंतु या सायबर विम्यामुळे त्यांना बँकिंग तपासाच्या काळात त्यांना त्यांची आर्थिक भरपाई मिळाली.
Case 2 : एका तरुणीचे सोशल मीडिया अकाउंट हॅक करून तिला ‘ब्लॅकमेल’ केले गेले. परंतु या विम्यांतर्गत मिळालेल्या ‘सायबर बुलीइंग’ कव्हरमुळे तिला कायदेशीर आणि मानसिक समुपदेशनाचा खर्च मिळाला.
प्रमुख विमा कंपन्या / Providers:
- SBI General Insurance (cyber vault insurance)
- HDFC ERGO (Cyber Sachet)
- Bajaj Allianz General Insurance (Cyber Safe)
२. विवाह विमा / Wedding Insurance
विवाह म्हंटल की खूप जास्त खर्च होत असतो (लोकाना खुश करण्यासाठी 😀) .आणि अनेक महिने आधी बुकिंग्सपण केले जातात. परंतु काही अनपेक्षित कारणांमुळे जर लग्न रद्द करावे लागले, तर होणारा तोटा असह्य असतो आणि मानसिक संतुलन सुद्धा बिगडन्याची शक्यता असते.
Use Cases:
- नैसर्गिक आपत्ती: नैसर्गिक आपत्ती ही सांगून येत नाही बरोबर, समजा जर लग्नाच्या आदल्या दिवशी मुसळधार पावसामुळे हॉल कोसळला किंवा पूर आला, तर विमा कंपनी हॉल आणि केटरिंगचे ‘ॲडव्हान्स’ दिलेले पैसे परत करते.
- आरोग्य आणीबाणी: जर वर किंवा वधूला लग्नाच्या दिवशी अचानक अपघात झाला किंवा कुठला गंभीर आजार झाला तर कार्यक्रम पुढे ढकलावा लागतो. तर याचा आर्थिक भार विमा कंपनी उचलते.
प्रमुख विमा कंपन्या / Providers
- ICICI Lombard
- Future Generali
- Bajaj Finserv
- National Insurance Company
३. पाळीव प्राण्यांचा विमा / Pet Insurance
भारतातील मध्यमवर्गीयांमध्ये आता पाळीव प्राण्यांना कुटुंबाचे सदस्य मानण्याची संस्कृती वाढली आहे. प्राण्यांचे उपचार आता महाग झाले आहेत तर तुम्हाला ही वाटत आहे का is pet insurance worth it? चला बघूया .
Use Cases:
- सर्जरी कव्हर: जर तुमच्या लाडक्या पाळीव कुत्र्याला कुठला गंभीर आजार झाला आणि शस्त्रक्रिया करावी लागली, तर ₹५०,००० ते ₹१ लाखांपर्यंतचा किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि हा खर्च विमा कव्हर करतो.
- थर्ड पार्टी लायबिलिटी: जर तुमच्या पाळीव प्राण्याने चुकून बाहेरच्या कोणा व्यक्तीला इजा पोहोचवली, तर होणारा कायदेशीर दंड किंवा उपचारांचा खर्च ही विमा कंपनी देते.
प्रमुख विमा कंपन्या / Providers :
- HDFC ERGO (Paws n Claws)
- Digit Insurance
- Reliance General Insurance
४. भाडेकरूंचा विमा / Renter’s Insurance
घरमालकाकडे त्याचा स्वतच्या घराचा विमा असतोच , पण भाड्याने राहणाऱ्या व्यक्तीचे सामान हे असुरक्षित असते. Right ? तर त्या केस मध्ये हा insurance खूप important आहे
Use Cases:
- चोरी: भाड्याच्या घरात घरफोडी झाली असेल आणि तुमचे सोन्याचे दागिने किंवा महागडा लॅपटॉप गेला, तर हा विमा तुम्हाला त्याची पूर्ण किंमत मिळवून देऊ सकतो .
- अग्निशमन: जर शॉर्ट सर्किटमुळे भाड्याच्या घरातील तुमच्या फर्निचरचे नुकसान झाले असेल , तर विमा कंपनी ही पूर्ण भरपाई देते.
प्रमुख विमा कंपन्या / Providers :
- Reliance General Insurance
- Digit Insurance
- Liberty General Insurance
५. की-मॅन इन्शुरन्स / Key Man Insurance
हा विमा प्रामुख्याने छोट्या आणि मध्यम उद्योजकांसाठी म्हणजेच MSMEs अत्यंत महत्त्वाचा आहे.
Use Cases:
- बिझनेस कोलमडणे: समजा एका सॉफ्टवेअर कंपनीचा ‘मुख्य डेव्हलपर’ हा त्या कंपनीचा कणा आहे. त्याच्या अचानक जाण्यामुळे कंपनीचे कोट्यवधींचे प्रोजेक्ट्स थांबतात. अशा वेळी कंपनीचे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी हा विमा घेतला जातो.
प्रमुख विमा कंपन्या / Providers :
- HDFC Life
- SBI Life
- LIC of India
६. ओळख चोरी विमा / Identity Theft Insurance
जर का तुमच्या पॅन कार्ड किंवा आधार कार्ड चा वापर करून कोणी बनावट व्यवहार केल्यास तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकता.
Use Cases:
- क्रेडिट स्कोर सुधारणे: जर कोणी तुमच्या नावे कर्ज घेतले आणि ते बुडवले, तर तुमचा सिबिल स्कोर खराब होतो. तो सुधारण्यासाठी लागणारा कायदेशीर खर्च आणि मदत हा विमा देतो.
प्रमुख विमा कंपन्या / Providers
- Bajaj Allianz
- AIG (Tata AIG)
- HDFC ERGO
७. घरगुती उपकरणे विमा / Home Appliances Insurance
आपल्या घरातील फ्रिज, टीव्ही, एसी आणि वॉशिंग मशिन यांच्या दुरुस्तीवर दरवर्षी हजारो रुपये खर्च होत असतात.
Use Cases:
- वॉरंटीच्या पलीकडे: जर तुमच्या टीव्हीची कंपनी वॉरंटी संपली असेल आणि त्यानंतर डिस्प्ले पॅनेल खराब झाला किंवा इतर काही प्रॉब्लेम झाला असेल , तर दुरुस्तीचा ₹२०,००० खर्च विमा कंपनी करते.
प्रमुख विमा कंपन्या / Providers :
- OneAssist
- HDFC ERGO
- Digit Insurance
८. प्रवास रद्द करणे विमा / Trip Cancellation Insurance
आपण नेहमीच ट्रॅवल करतो पण नेहमीच्या ट्रॅव्हल इन्शुरन्समध्ये हे कव्हर असतेच असे नाही. ‘Cancel for Any Reason’ हा एक वेगळा रायडर असतो.
Use Cases:
- प्रोफेशनल इमर्जन्सी: परदेशातील हॉटेल आणि फ्लाईट बुकिंग झाले आहे, पण ऐनवेळी ऑफिसमध्ये ऑडिट आले किंवा रजा रद्द झाली. अशा वेळी होणारे ‘cancellation charges ‘ हा विमा देतो.
प्रमुख विमा कंपन्या / Providers :
- Reliance General Insurance
- Tata AIG
- ICICI Lombard
९. पोर्टेबल इक्विपमेंट विमा / Portable Equipment Insurance
लॅपटॉप, कॅमेरा, टॅब्लेट्स आणि महागडे मोबाईल घराबाहेर चोरीला जाण्याची शक्यता जास्त असते.
Use Cases:
- प्रवासातील नुकसान: तुम्ही फोटोग्राफीसाठी गेला आहात आणि तुमचा ₹३ लाखांचा कॅमेरा चुकून दरीत पडला किंवा चोरीला गेला. हा विमा जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात संरक्षण देतो.
प्रमुख विमा कंपन्या (Providers):
- Digit Insurance
- New India Assurance
१०. अपहरण आणि खंडणी विमा / Kidnap & Ransom Insurance
हे प्रामुख्याने अति-श्रीमंत व्यक्ती (HNIs) आणि परदेशात काम करणाऱ्या उच्चपदस्थ लोकांसाठी आहे.
Use Cases:
- खंडणीची रक्कम: जर एखाद्या श्रीमंत व्यक्तीचे अपहरण झाले आणि खंडणी मागितली गेली, तर फक्त खंडणीची रक्कमच नाही, तर तपासाचा आणि सल्लागारांचा खर्चही विमा कंपनी उचलते.
प्रमुख विमा कंपन्या / Providers
- HDFC ERGO
- Tata AIG
- Chola MS General Insurance
10 Rare Insurance Types – विमा आणि गुंतवणूक यांचा ताळमेळ
फक्त विमा काढणेच पुरेसे नाही, तर तो तुमच्याFinancial Portfolio चा भागही असावा.
१.विमा ही गुंतवणूक नाही:विम्याला कधीही Mutual Fund किंवा sip सोबत जोडू नका. विमा हा केवळ संरक्षणासाठी आहे, नफ्यासाठी नाही हे लक्षात घेत खूप गरजेच आहे
२.योग्य Sum Assuredनिवडा:तुमच्या मालमत्तेच्या किंवा जबाबदारीच्या किमान १० ते १५ पट कव्हर निवडा.
३.डॉक्युमेंटेशन:विम्याचा दावा किंवा Claim करताना सर्वात महत्त्वाचे असतात ते म्हणजे कागदपत्रे.एफआयआर (FIR) प्रत, बिले आणि पुरावे नेहमी तयार ठेवा.
10 Rare Insurance Types : २०२६ मध्ये विमा घेताना लक्षात घ्यायच्या गोष्टी
१. डिजिटल क्लेम प्रोसेस:ज्या कंपन्यांची ॲप्स आणि ऑनलाइन क्लेम सेटलमेंट जलद आहे, त्यांनाच प्राधान्य द्या.
२.Exclusions (वगळलेल्या गोष्टी):पॉलिसी घेण्यापूर्वी या पॉलिसी मध्ये ‘काय कव्हर होणार नाही’ हे वाचणे खूप जास्त महत्त्वाचे आहे.
३. Claim Settlement Ratio (CSR): विमा कंपनी निवडताना तिचा सीएसआर तपासा (९५% च्या वर असावा).
तुम्ही सुरक्षित आहात का?
सहसा आपण Home Loan चे हप्ते वेळेवर भरतो आणि SIP कडेही लक्ष देतो, पण आपल्या आयुष्यातील अनपेक्षित धोक्यांकडे दुर्लक्ष करतो. वरील काही unique इन्शुरेंस प्रकारांपैकी किमान २-३ विमे (उदा. सायबर आणि अप्लायन्स) प्रत्येक आधुनिक कुटुंबाकडे असणे खूप गरजेचे आहे.
आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे केवळ पैसा कमवणे नाही, तर आलेला पैसा सुरक्षित ठेवणे आहे!
10 Rare Insurance Types : तुमच्या शंकांचे समाधान
1. विम्याचा दावा किंवा Claim नाकारला जाण्याची मुख्य कारणे कोणती?
माहिती लपवणे किंवा चुकीची माहिती देणे.तसेच ‘Exclusions’ (वगळलेल्या गोष्टी) नीट न वाचल्यामुळे अनेकदा दावे नाकारले जातात.
2. सायबर विमा घेण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?
साधारणपणे पॅन कार्ड, आधार कार्ड आणि तुमच्या बँक व्यवहारांची माहिती लागते.कोणत्याही सायबर हल्ल्याच्या वेळी ‘सायबर सेल’मध्ये FIR नोंदवणे अनिवार्य असते.
3. पाळीव प्राण्यांचा विमा कोणत्याही प्राण्याला मिळतो का?
सध्या भारतात प्रामुख्याने कुत्रा आणि मांजर यांच्यासाठी हा विमा उपलब्ध आहे.काही कंपन्या विशिष्ट वयाच्या (उदा.८ वर्षांवरील) प्राण्यांना विमा देत नाहीत.
४ हे युनिक विमे खूप महाग असतात का?
उलट हे विमे आरोग्य विम्याच्या तुलनेत स्वस्त असतात.उदाहरणार्थ, सायबर विमा वर्षाला केवळ ₹७०० ते ₹१५०० मध्ये उपलब्ध होऊ शकतो.
५ . एकाच कंपनीकडून सर्व विमे मिळतात का?
नाही.काही कंपन्या सायबर विम्यात तज्ज्ञ आहेत, तर काही पाळीव प्राण्यांच्या विम्यात.म्हणून आपल्या गरजेनुसार कंपनी निवडावी लागते
मोलाचा सल्ला : 10 Rare Insurance Types
२०२६ मध्ये Financial Planning म्हणजे केवळ बचत करणे नव्हे. तुम्ही कमावलेला एक-एक पैसा सुरक्षित ठेवणे ही तुमची जबाबदारी आहे. वर दिलेले विमा प्रकार हे लक्झरी नसून ती आजच्या काळाची गरज आहे. किमान सायबर विमा आणि घरातील सामानाचा विमा प्रत्येकाकडे असणे अनिवार्य आहे.
तुमच्या संपत्तीचे रक्षण करा, जेणेकरून तुमची स्वप्ने कधीही अर्धवट राहणार नाहीत
Next : Pradhan Mantri Mudra Yojana 2026: तुमच्या जिद्दीला मिळणार आर्थिक बळ!
Discover more from marathipaise.com
Subscribe to get the latest posts sent to your email.



