PMFBY

PMFBY 2026 : महाराष्ट्र सरकारची १ रुपयात पीक विमा योजना

PMFBY 2026 , Pradhan Mantri Fasal Bima Yojana : मित्रांनो जस की तुम्हालामाहीत च आहे की शेती हा मुख्यता निसर्गावरच आधारित असतो .कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ, तर कधी अवकाळी पाऊस शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घासही हिरावून नेतो. अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकऱ्याला मजबूत आर्थिक आधार देण्यासाठी भारत सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) चालू केलीमी  आहे. महाराष्ट्र सरकारने यामध्ये मोठी सुधारणा करत ‘केवळ १ रुपयात पीक विमा’ ही योजना राबवून शेतकऱ्यांवरील आर्थिक भार खूप जास्त कमी केला आहे.

या लेखा मधे आपण २०२६ मधील पीक विम्याचे नियम, अर्ज प्रक्रिया, नुकसान भरपाई कशी मिळवायची आणि विमा कंपन्यांशी संपर्क कसा साधायचा, याबद्दलची सर्व माहिती पाहणार आहोत. चला बघूया.

१. पीक विमा योजना (Crop insurance) म्हणजे काय?

Crop insurance ही एक प्रकारची सुरक्षा प्रणाली आहे. ज्या प्रमाणे आपण आपल्या आयुष्याचा किंवा वाहनाचा विमा काढतो, त्याच प्रमाणे पिकांचाही विमा काढला जातो. जर नैसर्गिक संकटामुळे (उदा. गारपीट, पूर, कीड) पिकाचे नुकसान झाले, तर विमा कंपनी त्या नुकसानीची भरपाई देत असते. यामुळे शेतकऱ्याला आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याची गरज पडत नाही आणि पुढील हंगामासाठी भांडवल उपलब्ध होत असते

२. महाराष्ट्र सरकारची ‘१ रुपयात पीक विमा’ योजना / Rs. 1 Crop Insurance Scheme

पूर्वी शेतकऱ्यांना विमा हप्त्याचा (Premium) २% ते ५% हिस्सा स्वतः भरावा लागत असे. परंतु , महाराष्ट्र सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेत शेतकऱ्यांचा हप्ता स्वतः भरण्याचे ठरवले आहे.

  • शेतकऱ्याचा हिस्सा: फक्त १ रुपया (नोंदणी शुल्क).
  • बाकी हप्ता: केंद्र आणि राज्य सरकार मिळून विमा कंपनीला तो हप्ता भरते.
  • फायदा: यामुळे राज्यातील लाखो अल्पभूधारक शेतकरी विम्याच्या छत्राखाली आले आहेत.

३. Crop Insurance योजनेचे मुख्य घटक

या योजनेत पिकाच्या पेरणी पासून ते काढणी नंतरच्या नुकसानी पर्यंतचे संरक्षण दिले जाते:

  • प्रतिबंधात्मक पेरणी

जर पावसामुळे किंवा प्रतिकूल हवामानामुळे शेतकरी पेरणी बिलकुलच करू शकला नाही, तर विमा संरक्षणा नुसार ठराविक रक्कम त्यांना दिली जाते.

  • स्थानिक नैसर्गिक आपत्ती

भूस्खलन, वीज पडणे ,गारपीट, किंवा ढगफुटी यामुळे एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून भरपाई ही दिली जाते.

  • काढणीपश्चात नुकसान

पीक कापून ठेवल्यानंतर जर १४ दिवसांच्या आत पाऊस किंवा चक्रीवादळा मुळे नुकसान झाले, तर विमा संरक्षण मिळते.

  • हंगामातील प्रतिकूल परिस्थिती

हंगामा च्या मध्यकाळात कडाक्याचा दुष्काळ ,अतिवृष्टी, किंवा पुर आल्यास पिकांचे जे नुकसान होते, त्याची भरपाई सुद्धा यात मिळते.

४. २०२६ मधील पात्र पिके

विमा संरक्षण हे जिल्हानुसार बदलू शकते, परंतु साधारणपणे खालील पिकांचा समावेश त्यामध्ये असतो:

  • रब्बी हंगाम: रब्बी ज्वारी, करडई, गहू, हरभरा, आणि जवस.
  • नगदी पिके: कांदा, ऊस (काही जिल्ह्यांत), आणि फळबागा.
  • खरीप हंगाम: कापूस, सोयाबीन, भात (धान), मका, तूर, मूग, उडीद, बाजरी आणि ज्वारी.

५. Crop insurance साठी आवश्यक कागदपत्रे

अर्ज करताना खालील कागदपत्रे डिजिटल स्वरूपात तयार ठेवा:

  • पीक पेरा प्रमाणपत्र / Self-Declaration of Crop : तलाठ्या कडे नोंदवलेला किंवा स्वतः स्वाक्षरी केलेला पीक पेरा.
  • बँक पासबुक / Bank Passbook : ज्याचे खाते आधार कार्डशी लिंक आहे.
  • आधार कार्ड / Aadhar Card): ओळखीचा पुरावा म्हणून लागतो
  • भाडेकरार / Lease Agreement : जर जमीन भाड्याने घेऊन कसत असाल तर.
  • ७/१२ उतारा (7/12 Extract): डिजिटल स्वाक्षरी असलेला नवीन उतारा.
  • ८-अ उतारा (8A Extract): जमिनीचा एकूण तपशील असलेला उतारा.

६. PMFBY : अर्ज करण्याची प्रक्रिया

इथे शेतकरी दोन प्रकारे अर्ज करू शकतात:

१. सीएससी केंद्र (CSC/Maha e-Seva Centre)

  • तुमच्या जवळच्या महा-ई-सेवा केंद्रात जाऊन वरील कागदपत्रे द्या.
  • तेथे तुमचा अर्ज भरला जाईल आणि तुम्हाला अधिकृत पावती मिळेल.

२. MahaDBT किंवा पीक विमा (PMFBY) पोर्टल

  • pmfby.gov.in या सरकारच्या पोर्टलवर जा.
  • ‘Farmer Corner’  सेक्शन मध्ये जाऊन नोंदणी करा.
  • आपली पीक , जमीन, आणि बँकेची व्यवस्तीत माहिती भरा.
  • गरेजेचे कागदपत्रे अपलोड करा आणि १ रुपया फी भरून पावती डाऊनलोड करा.

७. नुकसान झाल्यावर Claim प्रोसेस कशी करावी ?

हे या लेखातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. अनेक शेतकऱ्यांना विमा मिळवण्यासाठी काय करावे हे च माहित नसते.

  • ७२ तासांच्या आत सूचना

नुकसान झाल्या पासून ७२ तासांच्या आत विमा कंपनीला कळवणे हे अत्यंत बंधनकारक आहे. उशीर झाल्यास दावा फेटाळला जाऊ शकतो , त्यामुळे लगेच कळवणे हे खूप गरजेचे आहे

सूचना देण्याचे मार्ग

  • टोल-फ्री नंबर: विमा कंपनी च्या टोल-फ्री क्रमांका वर लगेच कॉल करा.
  • कृषी कार्यालय: लेखी स्वरूपात तालुका कृषी अधिकारी कार्यालयात माहिती द्या.
  • Crop Insurance App: हे गूगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा. यात नुकसानीचे फोटो आणि माहिती सहज अपलोड करता येते.

पंचनामा : माहिती दिल्यावर विमा कंपनीचा प्रतिनिधी (Surveyor) आणि कृषी विभागाचे अधिकारी तुमच्या शेतावर येऊन नुकसानीचा पंचनामा करतील.

८ . विमा कंपनीची निवड आणि जिल्हावार जबाबदारी

महाराष्ट्र सरकारने जिल्ह्यांची विभागणी  विभिन्न विमा कंपन्यांकडे केली आहे. २०२६ मध्ये खालील पैकी काही प्रमुख कंपन्या कार्यरत आहेत:

  • HDFC ERGO
  • ICICI Lombard
  • भारतीय कृषी विमा कंपनी
  • United India Insurance

टीप: तुमच्या जिल्ह्यासाठी कोणती कंपनी आहे हे पाहण्यासाठी mahadbt portal तपासा.

९. पीक विमा मिळण्यात येणाऱ्या अडचणी आणि उपाय

 पीक पेरा जुळत नाही.

  • उपाय: विमा अर्जात जे पीक नोंदवले आहे, तेच पीक ७/१२ च्या ई-पीक पाहणी (e-Peek Pahani) मध्ये नोंदवलेले असले पाहिजे

७२ तासांनंतर माहिती देणे.

  • उपाय: ७२ तास उलटले असल्यास ठोस कारण द्यावे लागते, परंतु तंत्रज्ञानाच्या युगात ‘Crop Insurance App’ वापरणे सर्वात सोपे आणि User friendly ही आहे

बँकिंग माहिती चुकीची असणे.

  • उपाय: तुमचे बँक खाते Aadhaar Seeded असल्याची खात्री करा. पैसे DBT द्वारे येतात, त्यामुळे आधार लिंक असणे अनिवार्य आहे.

१०. Crop Insurance २०२६: Digital Innovations

२०२६ मध्ये सरकारने काही तांत्रिक बदल केले आहेत:

  • ड्रोन सर्व्हे / Drone Survey : आजकाल डोंगराळ अथवा दुर्गम भागातील नुकसानी चे पंचनामे ड्रोन द्वारे केले जात आहेत.
  • थेट लाभ हस्तांतरण / Direct Payout : मधल्या कुठल्याही साखळीला वगळून पैसे थेट शेतकऱ्याच्या खात्यात जमा होतात
  • सॅटेलाइट इमेजरी / Satellite Monitoring : आता मोठ्या प्रमाणावरील नुकसानी चा अंदाज Satellite द्वारेघेतला जातो, ज्यामुळे पारदर्शकता ही पहिल्या पेक्षा जास्त वाढली आहे.

११. फळबाग पीक विमा / Weather based crop insurance scheme – WBCIS

हा Insurance चा प्रकार हवामाना वर आधारित असतो. यात प्रत्यक्ष नुकसानी पेक्षा हवामानाचे निकष (उदा. कमी पाऊस, जास्त थंडी, वेगाने वाहणारा वारा) महत्त्वाचे असतात.

  • पिके: आंबा, द्राक्षे, डाळिंब, केळी.संत्रा, मोसंबी,

जर तापमानाचा पारा ठराविक अंशापेक्षा खाली गेला किंवा पाऊस जास्त झाला, तर स्वयंचलित पणे विमा मंजूरही होतो.

१२. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाच्या टिप्स : PMFBY

  • ई-पीक पाहणी: आपल्या मोबाईलवरून ‘ई-पीक पाहणी’ वेळेत पूर्ण करा, कारण विमा कंपनी याच नोंदी consider करत असते
  • फोटोग्राफिक पुरावा: नुकसान झाल्यावर पंचनामा होईपर्यंत शक्य असल्यास नुकसानीचे फोटो आणि व्हिडिओ लगेचच काढून ठेवा.
  • वेळेत अर्ज करा: शेवटच्या तारखेची वाट न पाहता पेरणी झाल्याबरोबर विमा लगेचच उतरून घ्यायचा आहे.
  • पावती जपून ठेवा: विम्याची पावती (Acknowledgment Receipt) आणि अर्जाचा नंबर तुमच्याकडे असणे अत्यंत गरजेचे आहे.

३. Conclusion : PMFBY

नैसर्गिक आपत्तीवर आपले नियंत्रण बिलकुल नसते, परंतु आर्थिक नुकसानीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पीक विमा हे एकमेव साधन आहे. महाराष्ट्र सरकारच्या १ रुपयात पीक विमा’ योजनेमुळे हा विमा आता सर्वांनाच परवडणारा असा आहे. २०२६ मध्ये हवामानाचा अंदाज घेऊन आणि सरकारी योजनांचा लाभ घेऊन शेती केल्यास शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम नक्कीच होऊ सकतो

१४. Important Links : PMFBY

  • महाराष्ट्र कृषी विभाग: krishi.maharashtra.gov.in
  • अधिकृत पोर्टल: PMFBY
  • टोल फ्री मदत क्रमांक: १८००-१८०-१५५१ (किसान कॉल सेंटर)

FAQS : PMFBY

•पिक विमा प्रीमियम किती असतो?
काही राज्यांमध्ये केवळ ₹1 मध्ये विमा उपलब्ध हॉट आहे.

पिक विमा अर्ज कसा करावा?
Online portal किंवा बँकेत जाऊन अर्ज करता येतो.

•पिक विमा स्टेटस कसे तपासावे?

अधिकृत wesbsite वर मोबाईल नंबर/आधारने स्टेटस check करता येतो.

•पिक विमा योजना काय आहे?
पिकांच्या नुकसानीवर आर्थिक संरक्षण देणारी सरकारी योजना आहे.

•PMFBY मध्ये कोण अर्ज करू शकतो?
सर्व शेतकरी, विशेषतः जमीनधारक आणि भाडेकरू शेतकरी अर्ज करू शकतात.

Next : 10 Rare Insurance Types , 2026 – 99% लोकांना माहित नाही!


Discover more from marathipaise.com

Subscribe to get the latest posts sent to your email.

Ravi Pawar

Ravi Pawar

मी रवि पवार, Finance, Loan, Insurance, Business Ideas आणि Banking या विषयांमध्ये 10 वर्षांचा अनुभव असलेला ब्लॉग लेखक आहे. माझ्या लेखनाद्वारे मी सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत उपयुक्त आर्थिक माहिती देण्याचा प्रयत्न करतो, ज्यामुळे लोकांना योग्य आणि विचारपूर्वक निर्णय घेण्यास मदत होते.

Discover more from marathipaise.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading