E-Shram Card Payment : Government च्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाने असंघटित क्षेत्रातील कामगारांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ई-श्रम कार्ड योजना सुरू केलीली आहे. २०२६ मध्ये या योजनेचे स्वरूप अधिकच व्यापक झाले असून, करोडो कामगारांच्या खात्यात सरकारकडून आर्थिक मदत पाठवली जात आहे. पण आजही अनेक कामगारांना हे माहितच नाही की त्यांचे पैसे खात्यात आले आहेत की नाही आणि ते घरबसल्या कसे तपासावे .
तर या लेखामध्ये आपण ई-श्रम कार्डच्या पेमेंट स्टेटसपासून ते विमा क्लेम करण्यापर्यंतची सर्व माहिती अतिशय सविस्तरपणे पाहणार आहोत, चला बघूया .
१. ई-श्रम कार्ड म्हणजे काय?
ई-श्रम पोर्टल हे असंघटित क्षेत्रातील कामगारांचा एक database आहे. भारतात जवळपास ४० कोटीं पेक्षा जास्त लोक असंघटित क्षेत्रात काम करतात. यामध्ये फक्त अशा लोकांचाच समावेश होतो ज्यांच्याकडे ठराविक पगार, पीएफ (PF) किंवा पेन्शनची सुविधा अजिबात नसते.
UAN नंबरची ओळख:
ज्याप्रमाणे प्रत्येक नागरिकासाठी ‘आधार कार्ड’ आहे, त्याचप्रमाणे प्रत्येक कामगारासाठी हे १२ अंकी Universal Account Number (UAN) असलेले ई-श्रम कार्ड आहे. हे कार्ड एकदा काढले की ते पूर्ण आयुष्या साठी वैध असते.
२. e-shram card payment status २०२६: पैसे चेक करण्याच्या ५ पद्धती
आता तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही, हे तपासण्यासाठी बँकेत तासनतास रांगेत उभे राहण्याची अजिबात गरज नाही. तुम्ही ते खालील ५ पद्धतींनी हे चेक करू शकता:
PFMS Portal
PFMS म्हणजेच Public Financial Management System. सरकार जेव्हा DBT द्वारे पैसे पाठवते, तेव्हा त्याची नोंद येथे होत असते.
• Website : pfms.nic.in
• Process :
o अधिकृत वेबसाइट उघडा
o Know Your Payment या पर्यायावर क्लिक करा
o तुमची Bank (बँक) निवडा
o Account Number (खाते क्रमांक) टाका
o Confirm Account Number पुन्हा टाका
o Captcha code भरा
o Send OTP वर क्लिक करा
o मोबाईलवर आलेला OTP टाका
o Verify वर क्लिक करा
o स्क्रीनवर तुमचा Payment Status दिसेल
उमंग (UMANG) मोबाईल ऍप
हे केंद्र सरकारचे अधिकृत App आहे.
• App strore varun उमंग डाऊनलोड करा.
• Search मध्ये ‘E-Shram’ किंवा ‘PFMS’ टाईप करा.
• तुमचा मोबाईल नंबर टाकून status पहा.
बँकेचा ‘Missed Call’ नंबर
तुमचे खाते ज्या बँकेत आहे, त्या बँकेच्या बॅलन्स चौकशी नंबरवर मिस कॉल देऊन तुम्ही त्वरित बॅलन्स चेक करू शकता.
• उदा. Bank of Baroda: 8468001111
• उदा. SBI: 09223766666
आधार आधारित पेमेंट स्टेटस / AePS
जर तुमच्या गावात बँक नसेल, तर तुम्ही जवळच्या ‘आपले सरकार’ सेवा केंद्र किंवा सीएससी (CSC) Center वर जाऊन अंगठ्याचा ठसा देऊन पैसे आले की नाही हे तपासू शकता.
ई-श्रम अधिकृत पोर्टल
पोर्टलवर जाऊन ‘Update’ Section madhe तुमची लॉगिन माहिती भरून पेमेंट हिस्ट्री तपासता येते.
३. E-Shram Card Payment : पात्र व्यवसायांची सविस्तर यादी खालीलप्रमाणे
खूप लोकांना असे वाटते की हे कार्ड फक्त मजुरांसाठी आहे, पण खालील सर्व क्षेत्रातील लोक हे कार्ड काढू शकतात:
| क्षेत्र | पात्र व्यवसाय |
| कृषी क्षेत्र | शेतमजूर, अल्पभूधारक शेतकरी, पशुपालक, दुग्ध व्यावसायिक, मासेमार. |
| बांधकाम क्षेत्र | गवंडी, सुतार, लोहार, पेंटर, प्लंबर, वीटभट्टी कामगार, दगड फोडणारे. |
| सेवा क्षेत्र | रिक्षाचालक, ऑटो चालक, कुरिअर बॉईज, डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह (Zomato/Swiggy). |
| घरगुती कामगार | घरकाम करणाऱ्या महिला, स्वयंपाकी, सफाई कामगार, धोबी, न्हावी. |
| लहान व्यवसाय | भाजी विक्रेते, फळ विक्रेते, चहा टपरी चालक, वृत्तपत्र विक्रेते, शिंपी (Tailor). |
| आरोग्य/शिक्षण | आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, खाजगी शिकवणी घेणारे शिक्षक (असंघटित). |
४. २ लाख रुपयांचे संरक्षण कसे मिळवायचे?
ई-श्रम कार्डचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजेच अपघात विमा आहे . अनेक कामगारांना याची प्रक्रिया माहित नसल्यामुळे अपघातानंतर त्यांच्या कुटुंबाला मदत मिळत नाही.
विम्याचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे :
• पूर्ण अपंगत्व: २ लाख रुपये
• अंशतः अपंगत्व: १ लाख रुपये
• अपघाती मृत्यू: २ लाख रुपये
Claim करण्याची नेमकी प्रक्रिया काय आहे ?
• अपघाताची माहिती ३० दिवसांच्या आतच संबंधित बँकेला किंवा कामगार विभागाला न चुकता द्यावी लागते.
• मृत्यू झाल्यास वारसदाराने मृत्यू प्रमाणपत्र, एफआयआरची कॉपी आणि ई-श्रम कार्ड जमा करावे.
• पडताळणी झाल्यानंतरच पैसे वारसदाराच्या खात्यात जमा केले जातात.
५. E-Shram Card Payment २०२६ मधील नवीन नियम आणि तांत्रिक अडचणींचे निराकरण
ई-केवायसी /e-KYC
ज्यांनी २०२१-२२ मध्ये कार्ड काढले होते, त्यांना २०२६ मध्ये त्यांची माहिती अपडेट करणे बंधनकारक आहे. विशेषतः पत्ता किंवा मोबाईल नंबर बदलला असल्यास.
आधार सीडिंग अनिवार्य
तुमचे बँक खाते ‘आधार सीडेड’ नसेल, तर सरकार कितीही पैसे पाठवले तरी ते तुमच्या खात्यात जमा होणार नाहीत.
सामान्य समस्या आणि उपाय:
- बँक खाते बदलणे: ई-श्रम पोर्टलवर ‘Update Profile’ मध्ये जाऊन बँक डिटेल्स अपडेट करा.
- OTP येत नाही: तुमचा मोबाईल नंबर आधारशी लिंक असल्याची खात्री करा.
- फोटो दिसत नाही: प्रोफाइल अपडेट करून नवीन फोटो अपलोड करा.
६. ई-श्रम कार्ड आणि PM-SYM Yojana
ई-श्रम कार्ड धारकांसाठी प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना ही एक वरदान आहे.
- वय १८ ते ४० दरम्यान असल्यास तुम्ही यात सहभागी होऊ शकता.
- दरमहा ५५ ते २०० रुपयांपर्यंत गुंतवणूक करावी लागते.
- वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यावर ३००० रुपये दरमहा पेन्शन आयुष्यभर मिळते.
- कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीला ५०% पेन्शन मिळते.
७ . महिला कामगारांसाठी विशेष तरतुदी
ई-श्रम Portal महिलांची संख्या लक्षणीय आहे. महिलांसाठी खालील विशेष फायदे आहेत:
- प्रसूतीसाठी काही राज्यांमध्ये विशेष आर्थिक सहाय्य.
- मोफत शिलाई मशीन किंवा इतर व्यावसायिक साहित्यासाठी प्राधान्य.
- SHG महिलांना सहज कर्ज उपलब्धता.
८ . ई-श्रम कार्ड अपडेट करण्याचीपद्धत
जर तुमचे पैसे येत नसतील, तर तुम्हाला तुमचे कार्ड अपडेट करावे लागेल:
- eshram.gov.in link वर जा.
- ‘Already Registered? Update’ वर क्लिक करा.
- आधार नंबर आणि captcha टाकून OTP मिळवा.
- ‘Update Profile’ निवडा.
- बँक माहिती (Bank Account) तपासा, IFSC कोड बदला आणि ‘Save’ करा.
- नवीन कार्ड डाऊनलोड करा.
९ . E-Shram Card Payment : FAQs
रेशन कार्ड नसेल तर ई-श्रम कार्ड निघते का?
Yes , रेशन कार्ड अनिवार्य नसते. आधार कार्ड आणि बँक खाते पुरेसे आहे.
माझे वय ६० पेक्षा जास्त आहे, मी कार्ड काढू शकतो का?
नाही, ई-श्रम कार्डसाठी वयोमर्यादा ही १६ ते ५९ वर्षे आहे.
ई-श्रम कार्ड काढण्यासाठी पैसे लागतात का?
मुळीच नाही. सेल्फ-रजिस्ट्रेशन पूर्णपणे मोफत आहे.
पीएम किसान आणि ई-श्रम दोन्हीचे फायदे मिळतात का?
हो, जर तुम्ही अल्पभूधारक शेतकरी असाल आणि मजूर म्हणूनही काम करत असाल, तर तुम्ही दोन्ही योजनांसाठी पात्र आहात.
ई-श्रम कार्ड काढल्यानंतर काय करावे?
कार्ड डाउनलोड करून प्रिंट घ्या , UAN नंबर सुरक्षित ठेवा
माहिती अपडेट ठेवणे आवश्यक
ई-श्रम कार्डमध्ये माहिती बदलता येते का?
हो, तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन मोबाईल OTP द्वारे माहिती अपडेट करू शकता.
ई-श्रम कार्ड किती वर्षांसाठी वैध असते?
हे कार्ड आयुष्यभर वैध असते, पण माहिती वेळोवेळी अपडेट करावी लागते.
ई-श्रम कार्ड काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?
आधार कार्ड (मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक)
बँक खाते तपशील
मोबाईल नंबर
ई-श्रम कार्डचे फायदे काय आहेत?
₹2 लाखांपर्यंत अपघाती विमा
सरकारी योजनांचा थेट लाभ
भविष्यात पेन्शन किंवा इतर सहाय्य मिळण्याची शक्यता
Covered Topics: E-Shram Card Payment
- e Shram card payment status check online
- e Shram card payment list 2026
- e Shram card payment May 2026 update
- e Shram card payment status Maharashtra
- e Shram card payment check process
- ई-श्रम कार्ड माहिती
- ई श्रम कार्ड कसे काढावे
Next : Instant Loan Apps Safe आहेत का? (2026) RBI Rules & Risk.
Discover more from marathipaise.com
Subscribe to get the latest posts sent to your email.


