Startup India Loan Scheme : आजच्या बदलत्या काळात “नोकरी शोधणारा नाही, तर नोकरी देणारा व्हा” ही कल्पना खऱ्या अर्थाने आस्तित्वात येत आहे. भारत आज जगातील Third largest Startup Ecosystem म्हणून ओळखला जातो आहे मात्र, कोणताही मोठा वृक्ष होण्यासाठी जसे एका लहान बीजाला योग्य खतपाण्याची गरज असते, तसेच कोणत्याही Business Idea ला यशस्वी करण्यासाठी Capital (भांडवल) आणि Proper Funding ची गरज अवश्य असते.
म्हणून केंद्र सरकारने १६ जानेवारी २०१६ रोजी Startup India Initiative ची घोषणा केली आहे . यामागील मुख्य कारण म्हणजे देशातील होतकरू तरुणांना त्यांच्या संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आर्थिक आणि कायदेशीर पाठबळ देणे हेच आहे. या लेखात आपण Startup India Loan Scheme बद्दल A to Z माहिती घेणार आहोत.
१. Startup india अभियानाचा ऐतिहासिक संदर्भ आणि उद्दिष्टे
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा या योजनेची घोषणा केली, तेव्हा त्यांचा दृष्टिकोनआत्मनिर्भर भारत घडवण्याचा हाच होता.
- Simplification: सरकारी लालफितीच्या कारभारातून उद्योजकांची सुटका करणे.
- Funding Support: Banks आणि Venture Capitalists यांच्या माध्यमातून सुलभ कर्ज पुरवठा करून देणे.
- Job Creation: फक्त मोठ मोठ्या पदव्या घेऊन फिरणाऱ्या तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.
- Encouraging Innovation: नवीन तंत्रज्ञान आणि आधुनिक पद्धतींचा वापर करणाऱ्या उद्योगांना प्राधान्य देणे हे पण तेवडेच महत्तवाचे आहे
२. Startup India Loan Scheme अंतर्गत मिळणाऱ्या विविध कर्ज योजना
सरकारने startup च्या प्रत्येक टप्प्यावर (Early Stage, Growth Stage, Scale-up Stage) मदत करण्यासाठी स्वतंत्र योजना आखून ठेवल्याला आहेत.
२.१ Startup India Seed Fund Scheme (SISFS)
स्टार्टअप जेव्हा अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर असतो, तेव्हा त्याला Proof of Concept सिद्ध करण्यासाठी पैशांची गरज ही असतेच
- Funding Amount: चाचणी आणि Prototype साठी ₹२० लाखांपर्यंत अनुदान मिळते.
- बाजारपेठ प्रवेश आणि विस्तारासाठी ₹५० लाखांपर्यंत कर्ज किंवा परिवर्तनीय कर्जपत्रे.
- Eligibility: startup हे DPIIT कडून मान्यताप्राप्त असावे आणि नोंदणी होऊन २ वर्षांपेक्षा जास्त काळ झालेला नसावा.
- Target: नवीन startup ज्यांना उत्पादनाचा Prototype तयार करायचा आहे.
२.२ Credit Guarantee Scheme for Startups (CGSS)
बँकांकडून कर्ज घेताना लागणारे Collateral ही खरच मोठी अडचण असते आणि मध्यमवर्गीय तरुणांकडे तारण ठेवण्यासाठी मालमत्ता नसते.
- Loan Limit: या योजनेत ₹२० कोटींपर्यंतचे तारणमुक्त कर्ज मिळू शकते.
- Institutional Support: याच्या मध्ये सार्वजनिक बँका, खाजगी बँका आणि NBFCs (Non-Banking Financial Companies) यांचा समावेश आहे.
- Guarantee Cover: या योजनेअंतर्गत सरकार स्वतः बँकेला हमी देते. जर स्टार्टअप अयशस्वी झाले, तर तुमच्या कर्जाचा ७५% ते ८५% हिस्सा ही सरकारच भरते.
२.३ Fund of Funds for Startups (FFS)
Government ने स्टार्टअप्ससाठी सुमारे ₹१०,००० कोटींचा एक विशेष निधी तयार केला आहे, ज्याचे व्यवस्थापन SIDBI (Small Industries Development Bank of India) द्वारे केले जाते.
- Impact: यामुळे Indian स्टार्टअप्सना international गुंतवणुकीवर अवलंबून राहायची अजिबात गरज पडत नाही.
- Mechanism: हा निधी थेट स्टार्टअपला न देता Alternative Investment Funds (AIFs) ला दिला जातो त्यामुळे हे फंड मग चांगल्या स्टार्टअप्समध्ये भांडवल गुंतवतात.
३. पात्रता / Eligibility Criteria
यासाठी काही पात्रता आहेत आणि तुमच्या व्यवसायाला Startup India Loan मिळवण्यासाठी खालील निकष पूर्ण करणे अनिवार्य आहे, चला बघूया.
- Turnover Limit: कोणत्याही Financial year मध्ये कंपनीची उलाढाल ₹१०० कोटींपेक्षा जास्त नसावी
- Originality: व्यवसाय हा बिलकुल नवीन असावा. जुन्या कंपनीचे विभाजन करून किंवा पुनर्रचना करून बनवलेली संस्था यासाठी अपात्र आहे.
- Innovation & Scalability: व्यवसायात रोजगार निर्मितीची क्षमता असावी, नाविन्य असावे, आणि तो खूप मोठ्या स्तरावर नेण्यासारखा म्हणजेच Scalable असावा.
- Legal Structure: व्यवसाय हा LLP (Limited Liability Partnership) Private Limited Company किंवा Partnership Firm (नोंदणीकृत) असावा. वैयक्तिक मालकीचा व्यवसाय स्टार्टअपच्या व्याख्येत येत नाही.
- Registration Date: कंपनी स्थापन होऊन १० वर्षांपेक्षा जास्त काळ झालेला नसावा.
४. आवश्यक कागदपत्रे आणि Digital पडताळणी
सरकारी योजनांसाठी कागदपत्रे हीच यशाची पहिली पायरी आहेत.
- Certificate of Incorporation: कंपनी कधी स्थापित झाली त्या स्थापनेचा पुरावा.
- PAN & GST Registration: कंपनीचा GST क्रमांक आणि कायमस्वरूपी खाते क्रमांक.
- Promoter Details: संस्थापकांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, आणि संक्षिप्त परिचय
- Patent/IPR Documents: जर तुमच्याकडे पेटंट असेल, तर त्याचे पुरावे ही लागतील
- DPIIT Recognition Certificate: हे सर्वात महत्त्वाचे आहे. Startup india Portal वर नोंदणी केल्यावर हे प्रमाणपत्र मिळते.
- Detailed Business Plan (DPR): तुमच्या व्यवसायाचा सविस्तर प्रकल्प अहवाल. यामध्ये Market Research, Revenue Model आणि Financial Projections असणे आवश्यक आहे.
५. Startup India Loan Scheme : अर्ज करण्याची step by step प्रक्रिया
तुम्ही खालील ७ पायऱ्या वापरून कर्जासाठी अगदी सहजपणे अर्ज करू शकता:
१ : Registration on Portal www.startupindia.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुमच्या मोबाइल नंबर आणि ईमेलने नोंदणी करा.
२ : Profile Creation तुमच्या स्टार्टअपचे नाव, क्षेत्र म्हणजेच Sector, आणि उद्दिष्टे लिहून प्रोफाईल पूर्ण करा.
३ : Get DPIIT Recognition ‘Recognition’ टॅबवर क्लिक करा. येथे विचारलेली माहिती भरा आणि कागदपत्रे अपलोड करा. प्रमाणपत्र मिळण्यास साधारण ८-१० दिवस लागतात.
४ : Choose the Scheme तुमच्या व्यवसायाच्या गरजेनुसार Seed Fund किंवा Credit Guarantee Scheme निवडा.
५ : Apply to Incubators/Banks Seed fund तुम्हाला पोर्टलवर उपलब्ध असलेल्या मार्गदर्शक संस्था कडे अर्ज करावा लागतो. ते तुमच्या बिजनेस प्लॅनची मुलाखत घेतील.
६ : Due Diligence बँक किंवा Incubator तुमच्या व्यवसायाची तांत्रिक आणि आर्थिक पडताळणी करतील.
७ : Fund Disbursement सर्व अटी पूर्ण झाल्यावर कर्जाची रक्कम थेट तुमच्या स्टार्टअपच्या बँक खात्यात जमा केली जाते.
६.Startup India Loan Scheme विशेष कर लाभ / Tax Benefits for Startups
फक्त कर्जच नाही, तर सरकार तुम्हाला पैसे वाचवण्यासाठी खालील सवलती सुद्धा देते:
- Exemption from Angel Tax: कलम ५६(२)(viib) अंतर्गत मिळणाऱ्या गुंतवणुकीवर कर भरावा लागत नाही.
- Capital Gains Tax Exemption: जर एखाद्याने आपली मालमत्ता विकून तो पैसा स्टार्टअपमध्ये गुंतवला, तर त्याला Capital Gains Tax मधून सवलत मिळते.
- Income Tax Exemption (Section 80-IAC): पात्र स्टार्टअप्सना पहिल्या १० वर्षांपैकी सलग ३ वर्षांसाठी आयकरातून पूर्ण सूट मिळते.
७. स्टार्टअप म्हणून काम करताना मिळणाऱ्या इतर सवलती
- Patent Support: Patent शुल्कात ८०% आणि Trademark शुल्कात ५०% सूट मिळते. तसेच Fast Track Patent Processing ची सुविधा उपलब्ध आहे.
- Public Procurement: Government tender मध्ये स्टार्टअप्सना “Minimum Experience” आणि “Turnover” च्या अटींमधून सूट दिली जाते.
- Self-Certification: ९ कामगार आणि पर्यावरण कायद्यांचे पालन करण्यासाठी सुरुवातीच्या ५ वर्ष सरकारी Inspection होत नाही.
८. व्यवसायाचा यशस्वी ‘Business Plan’ कसा बनवावा?
बँकेला कर्ज देण्यासाठी तयार करण्यासाठी तुमचा Business Plan मजबूत असावा:
- Executive Summary: एका पानात व्यवसायाचा सारांश असावा
- The Problem: तुम्ही नेमकी कोणती समस्या सोडवत आहात? (उदा. Uber ने प्रवासाची समस्या सोडवली).
- Solution: तुमचे उत्पादन ही समस्या नेमकी कशी सोडवते?
- Market Opportunity: तुमचे साधारण किती संभाव्य ग्राहक आहेत?
- Competitive Analysis: तुमचे competitor कोण आहेत आणि तुम्ही त्यांच्यापेक्षाही चांगले कसे आहात?
- Go-to-Market Strategy: तुम्ही लोकांपर्यंत तुमचे उत्पादन कसे पोहोचवणार?
९. कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी आणि उपाय
बऱ्याच वेळेस नवीन उद्योजकांचे अर्ज नाकारले जातात. त्याची कारणे आणि उपाय खालीलप्रमाणे आहेत:
- Weak Revenue Model: व्यवसाय नफा कसा मिळेल याची स्पष्टता नसेल तर कर्ज बिलकुल मिळत नाही.
- Missing Compliance: कागदपत्रे पूर्ण नसतील तरीही अर्ज नाकारला जातो.
- Low CIBIL Score: संस्थापकांचा वैयक्तिक Cibil Score ७५० पेक्षा जास्त असावा.
- Solution: नेहमी Chartered Accountant (CA) किंवा Business Consultant चा सल्ला घेऊनच अर्ज सादर करा.
१०. Startup India Loan Scheme बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
Q१ . ही योजना ग्रामीण भागातील लोकांसाठी आहे का?
Ans: हो, ही योजना संपूर्ण भारतासाठीच आहे. ग्रामीण भागात कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या स्टार्टअप्सना विशेष प्राधान्य दिले जाते.
Q२ . एकापेक्षा जास्त वेळा कर्ज घेता येते का?
Ans: हो, घेता येते व्यवसायाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर तुम्ही वेगवेगळ्या योजनांचा (उदा. प्रथम सीड फंड आणि नंतर क्रेडिट गॅरंटी) लाभ घेऊ शकता.
Q३ . स्टार्टअप अयशस्वी झाले तर काय होईल?
Ans: प्रतेक व्यवसायात जोखीम असतेच. क्रेडिट गॅरंटी स्कीममुळे बँक तुमच्याकडून वैयक्तिक मालमत्तेची जप्ती करत नाही (विशिष्ट मर्यादेपर्यंत), मात्र कर्जाची परतफेड करणे ही नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी असते.
Q४ . Startup india लोनसाठी वयाची अट काय आहे?
Ans: याच्या साठी कोणताही भारतीय नागरिक ज्याचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त आहे, तो अर्ज करू शकतो.
Startup India Loan Scheme ही फक्त एक सरकारी योजना नसून ती नव्या दमाच्या उद्योजकांसाठी खरच ‘एक भक्कम पाया आहे. जर तुमच्याकडे Innovative Ideas असतील आणि ती प्रत्यक्षात आणण्याची तुमच्यात जिद्द असेल, तर पैशांची कमतरता आता तुमची स्वप्न रोखू शकणार नाही. Digital India chya या युगात, या सुवर्णसंधीचा अवश्य लाभ घ्या आणि स्वतःच्या स्वप्नांसोबत देशाच्या प्रगतीसाठी सुद्धा हातभार लावा.
Next : Pradhan Mantri Mudra Yojana 2026: तुमच्या जिद्दीला मिळणार आर्थिक बळ!
Discover more from marathipaise.com
Subscribe to get the latest posts sent to your email.



