Top Credit Cards in India : आजच्या महागाई च्या काळात Credit card हे फक्त उधारीचे साधन राहिलेले नाही आहे , तर ते आर्थिक नियोजनाचा एक खूप महत्त्वाचा भाग बनलेले आहे. जर तुम्ही योग्य Credit card निवडले, तर तुम्ही तुमच्या दरमहा खर्चावर खूप मोठी बचत करू शकता.
२०२६ मध्ये बँकांनी Artificial intelligence आणि Personalised offers चा वापर करून ग्राहकांसाठी अत्यंत फायदेशीर Credit Card बाजारात आणली आहेत.
या लेखात आपण २०२६ मधील भारतातील Top क्रेडिट कार्ड्स, त्यांचे फायदे, तोटे, पात्रता आणि अर्ज करण्याची प्रक्रिया यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. तर चला बघूया .
१. Credit Card म्हणजे नक्की काय?
क्रेडिट कार्ड हे बँकेने दिलेले एक प्लास्टिक किंवा मेटल कार्ड असते, ज्यामध्ये बँकेने तुम्हाला खर्च करण्यासाठी एक ठराविक मर्यादा म्हणजेच Credit Limitठरवून दिलेली असते. तुम्ही महिनाभर हे पैसे वापरू शकता आणि ठराविक मुदतीनंतर त्यालाच आपण Grace Periodम्हणतो ,ते बँकेला परत करू शकता. जर तुम्ही वेळेत पैसे भरले, तर बँक तुमच्याकडून कोणतेही व्याज घेत नाही.
२. 2026 मध्ये Credit Card असण्याचे फायदे
- कॅशबॅक / Cashback: तुम्ही केलेल्या प्रत्येक खर्चावर ठराविक टक्के रक्कम थेट तुमच्या खात्यात जमा होते, त्यालाच आपण Cashback म्हणतो.
- रिवॉर्ड पॉइंट्स / Reward Points: Shopping किंवा Travel वर मिळणारे पॉइंट्स तुम्ही व्हाउचर किंवा विमानाची तिकिटे बुक करण्यासाठीही वापरू शकता.
- विमानतळ लॉंज ॲक्सेस / Lounge Access: विमानतळावर मोफत खाणे-पिणे आणि विश्रांतीचीही सुविधा मिळते.
- क्रेडिट स्कोअरमध्ये सुधारणा:वेळेवर बिल भरल्यास तुमचा CIBIL स्कोअर वाढतो, ज्यामुळे भविष्यात कमी व्याजात Home Loan किंवा Car Loan लगेच मिळते.
- महागड्या वस्तूंसाठी EMI: तुम्ही मोठया खरेदी साठी दिलेले पैसे सहज हप्त्यांमध्ये देऊ शकता.
३. Top Credit Cards in India : 2026 मधील सर्वोत्तम क्रेडिट कार्ड्सची सविस्तर यादी खालीलप्रमाणे
Top Credit Cards in India
अ) शॉपिंग आणि कॅशबॅकसाठी सर्वोत्तम
१. SBI Cashback Credit Card
हे कार्ड सध्या भारतातील सर्वात जास्त लोकप्रिय कॅशबॅक कार्ड आहे.
- फायदे: कोणत्याही ऑनलाइन शॉपिंगवर ५% कॅशबॅक (Amazon, Flipkart, Myntra, etc .).
- ऑफलाइन: १% कॅशबॅक.
- फी: वार्षिक ₹९९९. २ लाख रुपये खर्च केल्यास फी माफ.
- का निवडावे? : ज्यांना reward points च्या हिशोबात पडायचे नाही आणि थेट बचत हवी आहे त्यांच्यासाठी हे card सर्वोत्तम आहे.
२. Amazon Pay ICICI Bank Credit Card
- फायदे: Amzaon Prime मेंबर्ससाठी ५% Non Prime साठी ३% कॅशबॅक.
- फी: कोणतीही वार्षिक फी नाही
- का निवडावे? जर तुम्ही Amazon वरुण जास्त खरेदी करत असाल, तर हे कार्ड तुमच्याकडे असायलाच हवे.
ब) Travel आणि Lifestyle साठी सर्वोत्तम
३. Axis Bank Atlas Credit Card
- फायदे: Flight Ticket booking var , ५% रिवॉर्ड्स. हे रिवॉर्ड्स तुम्ही एअर माइल्समध्ये रूपांतरित करू शकता.
- लॉंज ॲक्सेस: Domestic आणि International लॉंज ॲक्सेसची उत्तम सुविधा.
- का निवडावे? जे लोक वर्षातून ३ ते ४ वेळा विमान प्रवास करतात त्यांच्यासाठी तर हे वरदान आहे.
४. HDFC Regalia Gold Credit Card
- फायदे: हे एक Premium card आहे. Hotel आणि Flight बुकिंगवर विशेष सवलती मिळतात.
- विमा: Air accident cover आणि परदेशात वैद्यकीय मदतीसाठी विमा संरक्षण.
- फी: ₹२,५००.
क) Fuel आणि Utilities साठी सर्वोत्तम
५. SBI BPCL Octane Credit Card
- फायदे: पेट्रोल पंपावर खर्च केल्यास ७.२५% पर्यंत cash back .
- इतर: Grocery आणि Movie तिकीटांवर cash back
६. Axis ACE Credit Card
- फायदे: Google Pay द्वारे light bill , Gas bill आणि रिचार्ज केल्यास ५% कॅशबॅक.
४. क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी पात्रता/ Eligibility Criteria
Credit card मिळवण्यासाठी बँका खालील गोष्टीचेक करतात:
- वय: किमान १८ वर्षे परंतु काही बँकांसाठी २१ वर्षे पूर्ण झाले पाहिजे
- उत्पन्न: पगारदार व्यक्तीसाठी किमान ₹२०,००० ते ₹२५,००० मासिक पगार असावा लागतो आणि व्यावसायिकांसाठी वार्षिक ₹४ लाखांपेक्षा जास्त ITR.
- क्रेडिट स्कोअर: ७५० पेक्षा जास्त cibil score असणे आदर्श मानले जाते.
- रहिवासी पुरावा: तुम्ही राहत असलेल्या ठिकाणचे KYC कागदपत्रे.
५. क्रेडिट कार्डसाठी अर्ज कसा करावा?
- बँकेची निवड करा: तुमच्या गरजेनुसार म्हणजेच shopping किंवा Travel etc, साठी योग्य बँक आणि कार्ड निवडा.
- अधिकृत वेबसाइटला भेट द्या: बँकेच्या वेबसाइट वर ‘Credit Cards’ च्या Section मध्ये जा.
- माहिती भरा: तुमचे नाव, मोबाईल नंबर, उत्पन्न आणि pan card नंबर भरा.
- कागदपत्रे अपलोड करा: आधार कार्ड, पॅन कार्ड आणि सॅलरी स्लिपची डिजिटल कॉपी अपलोड करावे लागेल .
- VKYC पूर्ण करा: व्हिडिओ कॉलद्वारे तुमची केवायसी करून ओळख पटवावी लागते .
- डिलिव्हरी: अर्ज मंजूर झाल्यानंतर ७ ते १० दिवसांत कार्ड तुमच्या पत्त्यावर पोहोचेल.
६. क्रेडिट कार्ड वापरतानाच्या १० सुवर्ण टिप्स : Top Credit Cards in India
- नेहमीच पूर्ण बिल भरा: Minimum Amount Due’ भरण्याच्या फंदात बिलकुल पडू नका, यामुळे तुम्ही कर्जाच्या चक्रात आणखीन जास्त अडकू शकता.
- क्रेडिट युटिलायझेशन: तुमच्या एकूण Limit च्या फक्त ३०% च रक्कम वापरा.
- बिलाची तारीख लक्षात ठेवा: जर बिल भरण्यास एक दिवसही उशीर झाला तरी मोठा दंड आणि व्याज आकारले जाते हे लक्षात ठेवा .
- रिवॉर्ड्स रिडीम करा: Rewards पॉइंट्सची मुदत संपण्यापूर्वी ते वापरा.
- विदेशी व्यवहार: परदेशात कार्ड वापरताना ‘Forex Markup Fee’ तपासा.
- कार्ड ब्लॉक करणे: कार्ड हरवल्यास लगेच बँकेच्या ॲपवरून ते ब्लॉक करा, न वेळ दवडता.
- खर्चावर नियंत्रण: Credit cardम्हणजे फुकट चे पैसे’ नव्हे, हे नेहमीच लक्षात ठेवले पाहिजे.
- ऑटो-डेबिट: ऑटो-डेबिट सुविधा सुरू करा म्हणजे तुमचा ईएमआय चुकणार नाही .
- ATM मधून पैसे काढू नका: Credit card ने ATMमधून पैसे काढल्यास ४०% पर्यंत वार्षिक व्याज आणि Transaction फी लागू सकते.
- सुरक्षा: तुमचा PIN आणि OTPकोणालाही बिलकूल शेअर करू नका.
७. Top Credit Cards in India : वारंवार विचारले जाणारे प्रश्न
- सर्वात जास्त देणारे Cashback कार्ड कोणते?
2026 मध्ये SBI Cashback Credit Card हे ऑनलाइन खर्चावर ५% थेट कॅशबॅक देते, जे सध्या बाजारात सर्वात जास्त आहे आणि त्यामुळेच जास्त वापरले पण जात आहे.
- क्रेडिट कार्डमुळे Cibil scroe खराब होतो का?
नाही, बिलकुल नाही उलट जर तुम्ही वेळेवर बिले भरली, तर क्रेडिट कार्डमुळे तुमचा सिबिल स्कोअर नक्कीच सुधारतो. फक्त तुम्ही तुमची क्रेडिट मर्यादा ओलांडू नका.
- Joining फी आणि Annual फी मध्ये काय फरक आहे?
Joining फी ही कार्ड घेताना एकदाच भरावी लागते. Annual फी ही दरवर्षी कार्ड चालू ठेवण्यासाठी भरावी लागते. अनेक बँका ठराविक खर्च केल्यावर ही फी माफ करतात.
- क्रेडिट कार्ड बंद केल्याने स्कोअरवर परिणाम होतो का?
होय,नक्कीच. जुने क्रेडिट कार्ड बंद केल्याने तुमच्या क्रेडिट हिस्ट्रीची लांबी बऱ्यापैकी कमी होते, ज्यामुळे स्कोअरवर थोडा नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
- Reward Points चे पैशात रूपांतर करता येते का?
काही Cards for example SBI Cashback, थेट पैसे जमा करतात, तर काही कार्डे तुम्हाला रिवॉर्ड पॉइंट्सच्या बदल्यात voucher देतात किंवा तुमच्या बिलातून ते पैसे वजा करतात.
- Cibilscore शून्य असल्यास कार्ड मिळेल का?
जर तुमची कोणतीही क्रेडिट hisotry नसेल, तर तुम्ही ‘FD (Fixed Deposit) आधारित क्रेडिट कार्ड’ घेऊ शकता. यामुळे तुमचा स्कोअर तयार होण्यास नक्कीच मदत होईल.
- No Cost EMI म्हणजे काय?
यामध्ये तुम्हाला वस्तूच्या किमती व्यतिरिक्त कोणतेही अतिरिक्त व्याज भरावे लागत नाही. परंतु , बँका अनेकदा यावर Processing Fee आकारतातच
- मी एकाच वेळी जास्तीत जास्त किती क्रेडिट कार्ड ठेवू शकतो?
तुम्ही कितीही कार्ड ठेवू शकता, पण तज्ज्ञांच्या मते किमान २ ते ३ कार्डे व्यवस्थापित करणे सोपे असते आणि सर्व फायद्यांचा लाभही घेता येतो.
Top Credit Cards in India : Conclusion
2026 मध्ये Credit card निवडताना केवळ ‘दिखावा’ न करता तुमचे ‘खर्च करण्याची पद्धत’ पहा जर तुम्ही मध्यमवर्गीय असाल आणि घरगुती खर्च खूप जास्त असतील, तर Axis ACE किंवा Amazon Pay ICICI उत्तम आहे. जर तुम्ही उच्च उत्पन्न गटात असाल, तर HDFC Infinia किंवा Axis Magnus सारखी कार्डे तुम्हाला लाखो रुपयांचे फायदेही मिळवून देऊ शकतात.
एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, Credit Card हे एक खूप गरजेचे आर्थिक साधन आहे. त्याचा जबाबदारीने वापर केल्यास ते तुमची संपत्ती नक्कीच वाढवते, अन्यथा ते तुम्हाला कर्जाच्या खाईत ढकलूही शकते.
Expert Tip : Top Credit Cards in India
तुमचे पहिले क्रेडिट कार्ड नेहमी ‘Lifetime Free’ च घेण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला वापरायला सोपे जाईल आणि खर्चाचे ओझेही राहणार नाही.
Next : Pocket Friendly Business Ideas, 2026: कमी खर्चात मोठा नफा !
Discover more from marathipaise.com
Subscribe to get the latest posts sent to your email.



